पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वृत्तपत्रांनी बजावलेली भूमिका आजच्या लोकशाही भारताती अपवादाने आढळेल इतकी आदर्श होती. हे सर्व सयाजीरावांच्या वैश्विक, मानवतावादी, सर्वसमावेशक आणि जनकल्याणकारी तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानामुळेच शक्य झाले.
सर्वसमावेशक सयाजीराव

 महाराजा सयाजीराव गायकवाड हे अतिशय दूरदृष्टीचे आणि गुणग्राहक राज्यकर्ते होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक गुणवान लोकांनाराजाश्रयदिला आणित्यांच्याकडून जनहिताची मोठी कामे करून घेतली. महाराजांच्या प्रजावात्सल्य व विद्यासक्तीमुळे संस्थानात वर्तमानपत्रांचा प्रसार वाढला होता. सयाजीरावांनी सर्व विचारसरणींच्या पत्रकारांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. राजा आणि प्रजा या उभयतांच्या कल्याणासाठी त्यांना अधिक सवलती व स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता सयाजीरावांनी ओळखली होती. महाराज आपल्या विरोधी मते असणाऱ्यांचादेखील स्वीकार करत. संवेदनशील विषयाबाबत तज्ज्ञांशी सविस्तर सल्लामसलत करत, प्रसंगी विशेष समिती स्थापन करत आणि मगच निर्णय घेत. परिणामी एक वैचारिक संवादाचे निखळ वातावरण महाराजांच्या कारकीर्दीत बडोदा संस्थानात निर्माण झाले. या संदर्भात 'नवगुजरात' साप्ताहिकाचे चिमणलाल एम. डॉक्टर यांचा अनुभव महाराजांच्या धोरणाला पूरक आहे. चिमणलाल म्हणतात, "मी 'नवगुजरात' साप्ताहिकम

हाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / ८