पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांगणारा ‘नीतिकाव्यामृत' हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. १९३३ मध्ये 'नीतिशास्त्र प्रबोधन' हा भारतीय नीतिमत्तेचे आणि पाश्चिमात्य नीतिमत्तेचे तुलनात्मक विवेचन करणारा ग्रंथ रचला.
रियासतकार सरदेसाई
 महाराजांमुळेच रियासतकार म्हणून खरी ओळख मिळालेले गो. स. सरदेसाई आपल्या लेखनकार्याचे सर्व श्रेय महाराजांना देतात. १८८० मध्ये सरदेसाई यांनी इंग्लंड, ग्रीस आणि हिंदुस्थान या देशांच्या अर्वाचीन इतिहासावरील ग्रंथ लिहिले. तसेच 'मराठी राजवट या ग्रंथात त्यांनी पेशवेकालीन महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर असलेल्या मराठी राजवटींची चर्चा केली आहे. बडोदा संस्थानचे पहिले मराठी लष्करप्रमुख जनरल नानासाहेब शिंदे यांनी १९२० मध्ये भारताच्या इतिहासातील मोठ्या लढायांची रणनीती आणि शौर्याची माहिती 'हिंदुस्तानचा लष्करी इतिहास आणि दोस्त राष्ट्रांच्या फौजा' या पुस्तकात दिली आहे. हे मराठीतील पहिले व आजवरचे अशा प्रकारचे एकमेव पुस्तक आहे.

 राजरत्न प्रो. माणिकराव यांनी १८०० शस्त्रांची विस्तृत माहिती देणारा 'प्रतापशस्त्रागार' हा ग्रंथ तसेच व्यायाम मंदिर, शरीरशास्त्र, मालिश, संघव्यायाम ही महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली. आबासाहेब मुजुमदार यांनी 'व्यायाम' नावाचे सचित्र मराठी मासिक प्रकाशित केले. १९३६ ते १९४९ या काळात मुजुमदार यांनी मराठीतील आणि बहुधा कोणत्याही भारतीय भाषेतील

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / १०