पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यशस्वी चित्रपट निर्मात्याचा विकास होण्यासाठी ज्या ज्या अंगभूत गुणांची जरूर असते ते मिळवण्यास खूप मदत केली. आज जे माझे वैभव आहे त्याचे श्रेय माझ्या बडोद्याच्या वास्तव्याला आणि तिथल्या कलाभवनच्या तंत्रज्ञानाला आहे.' महाराजांनी १९२९ मध्ये बडोद्यात पहिले चित्रपटगृह सुरू केले. पुढे तेच चित्रपटगृह शिवाजी - चित्रभवन व नंतर प्रिन्स टॉकीज या नावाने प्रसिद्ध झाले.
 साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या सात नाटकांवरचा अभ्यासपूर्ण प्रबंध, प्रा. वि. पा. दांडेकर यांनी लिहिलेली 'फेरफटका टेकडीवरून', 'काळ खेळतो आहे', 'एक पाऊल पुढे' असे लघुनिबंध बडोद्यातून प्रकाशित झाले.
संगीत कला
 विष्णू नारायण भातखंडे हे हिदुस्थानी संगीताचे संशोधक, संगीतकार आणि प्रख्यात गायक होते. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची 'थाट पद्धत' विकसित केली. भातखंडे या संगीत शास्त्रज्ञांनी एक नवीन पध्दतीचे स्वरलेखन अथवा नोटेशन तयार केले होते, महाराजांनी हे नोटेशन बडोद्यात गायनशाळांतून चालविण्याची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर महाराजांनी भातखंडे यांच्याकडून गायनशास्त्रावर पुस्तके तयार करवून घेतली.

 भातखंडे यांनी हिंदुस्थानात सर्व प्रांतात फिरून गायनशास्त्रातील प्राचीन ग्रंथ मिळवून त्याचा अभ्यास करून

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / १६