पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विठ्ठल रामजी शिंदे
 अस्पृश्योद्धाराचे कार्य जीवनध्येय म्हणून अंगीकारणाऱ्या विठ्ठल रामजी शिंदेंना बी.ए आणि एल. एल. बी. शिक्षणासाठी एकूण ५ वर्ष १,५०० रु. शिष्यवृत्ती दिली. १९०१ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात धर्माच्या तुलनात्मक अभ्यासासाठी १,५०० रु. प्रवासखर्च ही दिला. १९०५ मध्ये वि. रा शिंदे यांचे 'अस्पृश्योद्धार' या विषयावर बडोद्याच्या न्यायमंदिराच्या दिवाणखान्यात एक व्याख्यान करवून हेच व्याख्यान 'बहिष्कृत भारत' या स्वतंत्र पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकाच्या १,००० प्रती महाराजांनी विकत घेऊन संस्थानात वाटल्या. १९१८ मध्ये वि.रा शिंदे यांनी मुंबई येथे भरवलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव होते. या परिषदेत भारतातील पहिला अस्पृश्य निवारण ठराव मांडला गेला. यावर पहिली सही करणारी व्यक्ती सयाजीराव होते.
राजर्षी शाहूंचे मार्गदर्शक आणि आदर्श

 शाहू महाराज आणि सयाजीराव या दोघांमधील पुरोगामी संवाद हा १९०० च्या कोल्हापुरातील वेदोक्तापासून ते १९२२ मध्ये शाहूंच्या निधनापर्यंत होता. कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा प्रश्न टोकाचा झाला तेव्हा शाहूंनी हे प्रकरण हाताळताना सयाजीरावांची मदत घेतली. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला मुंबई विद्यापीठाचे कायमस्वरूपी संलग्नीकरणासाठीसुद्धा मदत मागितली. सयाजीरावांचे विश्वासू सहकारी खासेराव जाधवांना

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / २१