पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दामोदर यंदे
 मराठा जातीतील दामोदर सावळाराम यंदे हे मराठी भाषेतील पहिले सर्वात मोठे प्रकाशक होते. मराठीला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारे अत्यंत मौलिक ग्रंथ यंदे यांनी महाराजांच्या आश्रयाने बडोद्यातून प्रकाशित केले. त्यामुळे मराठी साहित्य, समाज आणि संस्कृतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी ज्या प्रकाशकांचा मुख्य वाटा आहे त्यामध्ये यंदे हे सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्रातील विद्वानांनाही 'हे यंदे कोण?' हा प्रश्न पडत असेल तर महाराष्ट्राचे आजचे 'ज्ञानवास्तव' आपल्या प्रबोधन परंपरेची पुनर्मांडणी करण्याची प्रेरणा देणारे ठरेल.
 मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन सयाजीरावांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याचे धोरण अवलंबिले. परंतु सर्व अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करणे शक्य नसल्याने निरनिराळ्या शिक्षकांनी, अभ्यासकांनी व तज्ज्ञ गृहस्थांनी आपापल्या विषयावर सोपे आणि परिपूर्ण ग्रंथ लिहून परभाषेवरील अवलंबित्व दर करण्याचे आवाहन सयाजीरावांनी केले. यानुसार १९३० मध्ये प्रा. बा. प्र. मोडक यांनी 'पदार्थविज्ञान', प्रा.मा.क. भाटवडेकर यांनी 'वनस्पतिशास्त्र' तर प्रा. मो. के. दामले यांनी 'सृष्टिशास्त्र' या पुस्तकामध्ये त्या काळापर्यंतच्या विविध शोधांची माहिती करून दिली आहे.

 मा.धो. खांडेकर यांनी नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक या तिन्ही संस्कृत रचनांचे मराठी भाषेत सार

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / ९