पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मार्फत इंग्लंडमधील इंडिया हाऊसला निवेदनाच्या माध्यमातून केली. याबरोबरच गांधींच्या आफ्रिकेतील लढ्यासाठी त्यांनी आर्थिक मदतदेखील पाठवली. १९९५ मध्ये आफ्रिकेतून भारतात आलेल्या महात्मा गांधींनी पुढे काँग्रेसच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या या प्रयत्नांना विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संस्थात्मक कार्याची पार्श्वभूमी लाभली होती. राष्ट्रीय काँग्रेसने अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हाती घ्यावा यासाठी विठ्ठल रामजी शिंदेंनी १९०७ पासून राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. १९०७ ते १९९७ या दहा वर्षांतील शिंदेंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर १९१७ च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करण्यात आला.

 १९९५ मध्ये आफ्रिकेतून परतल्यानंतर गांधींनी तत्कालीन भारत समजून घेण्याच्या उद्देशाने रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून देशभर प्रवास केला. त्यांचा हा प्रवास म्हणजे राज्याधिकार प्राप्तीनंतर १८८२-१८८४ दरम्यान सयाजीरावांनी संस्थानातील जनतेची स्थिती समजून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या बडोदा दौऱ्याचे ३१ वर्षानंतर योगायोगाने केलेले 'अनुकरण'च होते.

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / १०