पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मराठा न्यायाधीश खंडेराव बागल, शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी पी. सी. पाटील ही काही प्रमुख उदाहरणे सांगता येतील. यावरून असे दिसते की शाहू महाराजांच्या कार्याला बडोदा आणि सयाजीरावांकडून मिळालेली प्रेरणा, नैतिक पाठबळ आणि सहकार्य हे वादळातील दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे ठरले आहे.
 विविध सामाजिक सुधारणांसाठी सयाजीराव आणि बडोदा हा शाहू महाराजांचा कसा हक्काचा आधार होता हे शाहू महाराजांनी कर्नल वूडहाऊसला १९१८ व १९१९ मध्ये लिहिलेल्या पत्रातून पुन्हा एकदा प्रतीत होते. या पत्रात शाहू महाराज म्हणतात,"...की पंडित आत्माराम या आर्य समाजाच्या सभासदाकडे आपण सत्यशोधक समाजाच्या लोकांना वेद शिकविण्यासाठी एखादी जाणकार व्यक्ती पाठवा अशी विचारणा केली आहे." महाराजांनी आर्य समाज आणि पंडित आत्माराम यांच्या माध्यमातून बडोद्यातील अस्पृश्य शिक्षणाबाबत मूलभूत आणि पथदर्शक काम केले होते. शाहू महाराजांसाठी तो 'अनुकरणीय' आदर्श होता. हेच वरील विवेचनावरून स्पष्ट होते.
 आर्य समाज, सयाजीराव आणि शाहू यांच्यातील सहसंबंध डॉ. रा.चिं. ढेरे यांनी अतिशय दुर्मिळ संदर्भाच्या आधारे मांडला आहे. तोसुद्धा सयाजीराव आणि शाहू यांच्यातील मार्गदर्शक आणि अनुयायी या नात्यावर स्वच्छ प्रकाश टाकणारा आहे. डॉ. ढेरे लिहितात, “महाराजांचे धाकटे बंधू संपतराव गायकवाड यांनी स्वामीजींना कळवले होते की, आर्य समाजाच्या विचारांच्या

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ३३