पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसारासाठीच नव्हे तर समाजसेवेच्यासाठी विशेषत: अंतजांच्या शिक्षणासाठी उपयोग व्हावा म्हणून महाराजांनी बडोदा शहराच्या परिसरातच एक वास्तू देण्याची इच्छा दर्शवली आहे.
 असे हे आर्य समाजाच्या प्रचारकांनी प्रभावित केलेले बडोदा शहर आणि तेथील सयाजीरावांसारखे निर्भय, निरामय, प्रागतिक शासक राजर्षी शाहूंच्या प्रेमाचे विषय होते. राजर्षीच्या पत्नी महाराणी लक्ष्मीबाई बडोद्यातीलच. गुणाजीराव खानविलकर या जहागीरदारांच्या कन्या होत्या आणि हे घराणे गायकवाड घराण्याशी निकटच्या नातेसंबंधातील होते. महाराणी लक्ष्मीबाईंच्या आजींचे सयाजीरावांशी बंधुत्वाचे नाते होते. राजर्षीवर बडोद्याचा अवीट प्रभाव होता." ढेरेंनी आर्य समाजाच्या अंगाने राजर्षी शाहूंवरील 'सयाजी प्रभाव' वरीलप्रमाणे स्पष्ट केला आहे. शाहूंच्या सर्वच पुरोगामी धोरणांवर 'सयाजी प्रभाव' नाकारता न येण्याइतका स्पष्ट आहे. परंतु शाहूंवरील अलीकडच्या एका सर्वात परिपूर्ण आणि संशोधनात्मक 'महाप्रकल्पा'त मात्र सयाजीरावांचा संबंध केवळ 'अर्पणपत्रिके'त 'बांधून ठेवला आहे हे विशेष. यावर स्वतंत्र संशोधन होण्याची नितांत गरज आहे.
महाराजा सयाजीराव : राजर्षी शाहूंचे 'फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड'
 महाराजा सयाजीराव राजर्षी शाहूंसाठी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड होते यावर प्रकाश टाकणारे लॉर्ड कर्झनचे एक पत्र शाहू पेपर्समध्ये उपलब्ध आहे. या पत्रात कर्झनने भारतीय

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ३४