पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राज्यकर्त्यांचा आदर्श सयाजीराव कसे आहेत यावर भाष्य केले आहे. हे पत्र सयाजीरावांचे भारतातील प्रागतिक प्रशासक म्हणून असणारे स्थान स्पष्ट करते. कर्झन भारतातला आपला कार्यकाळ पूर्ण करून परत जात असताना निरोप समारंभात लॉर्ड कर्झनची शाहू महाराजांशी भेट झाली. यावेळी कर्झनने सयाजीरावांबद्दल जे गौरवोद्गार काढले होते त्याबद्दल सयाजीरावांचे अभिनंदन करणारे पत्र शाहू महाराजांनी सयाजीरावांना २२ एप्रिल १९०८ रोजी लिहिले होते. त्या पत्रात सयाजीरावांबद्दल कर्झन काय म्हणाले हे सांगताना शाहू महाराज लिहितात, 'His ideas of comparing Your Highness to a steam engine is original and quite true. I quite agree with every one of what he says. I only hope that there may be some more Chiefs to follow in Your Highness' footsteps.'
 येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागते ती अशी की ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये सयाजीरावांचा सर्वाधिक संघर्ष लॉर्ड कर्झनशी झाला होता. असे असूनही कर्झन सयाजीरावांबद्दल जे बोलतो ते अधिक महत्त्वाचे आहे. सयाजीरावांच्या प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानिकांनी करावे असे जेव्हा कर्झन शाहू महाराजांना सांगतो तेव्हा शाहू महाराजांनी तो आदर्श अवलंबावा हेच कर्झन सूचित करतो. २२ सप्टेंबर १९१७ ला राजर्षी शाहूंनी सयाजीरावांना लिहिलेल्या पत्रात आपले जीवनध्येय पुढील शब्दात व्यक्त केले आहे. “I want to get it

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ३५