पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आदर्श सर्व भारतीय राजांनी ठेवणे कसे आवश्यक आहे हे स्पष्ट केले होते, तर दुसऱ्या एका पत्रात सम्राट अकबराची न्यायप्रियता कथन केली होती.” हे उदाहरण शाहू महाराजांच्या वैचारिक जडणघडणीवर आणि त्याच्या बडोदा संदर्भावर प्रकाश टाकणारे आहे.
 महाराष्ट्र फुल्यांनंतर ‘घाईघाई' ने थेट शाहूंकडे येत असताना किती मोठा 'बौद्धिक अपघात' करत आला हेच वरील अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होते. मामा परमानंद हे फुल्यांचे मित्र आणि हितचिंतक होते. फुल्यांनी त्यांच्या समग्र लेखनात व्यक्त केलेल्या समाजपरिवर्तनाच्या अपेक्षा फुल्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक प्रमाणात सयाजीरावांनी सिद्ध केल्या. याच धर्तीवर मामा परमानंदांनी सयाजीरावांच्या राज्याधिकार प्राप्तीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलेल्या अपेक्षाही सयाजीरावांनी मामा पर्मानंदांच्या कल्पनेपलीकडे जाऊन पूर्ण केल्या होत्या हे सयाजीरावांच्या संपूर्ण कारकीर्दीआधारे म्हणता येईल.
 फुल्यांचा वारसा सयाजीरावांच्या मार्गे शाहूंकडे कसा आला होता यावर यातून प्रकाश पडतो. इतकेच नव्हे तर स्वतंत्र भारताची लोकशाही राज्यघटनेतील अनेक कलमेही बडोद्यातील कायद्यांशी सुसंगत आहेत. त्यामुळे स्वतंत्र भारतातील सामाजिक लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ म्हणूनसुद्धा सयाजीरावांचा विचार करणे अपरिहार्य ठरते. त्यामुळेच आपण जेव्हा फुले-शाहू- आंबेडकर म्हणतो तेव्हा राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकरांन

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ४३