पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोदा राजाश्रयानंतर राजा रवी वर्मांना चित्रकला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रबळ इच्छा झाली होती. राजा रवी वर्मा यांचा जन्म केरळमधील किलीमानूर नामक गावात २९ एप्रिल १८४८ मध्ये झाला. त्यांचे काका तंजावर शैलीचे चित्रकार, आई उमा अंबाबाई तंपुराटटी एक सिद्ध कवयित्री होती, तर वडील एजिमाविल भट्टतिरिप्पाट हे संस्कृतचे विद्वान होते. आज राजा रवी वर्मा (१८४८-१९०६) हे जगप्रसिध्द चित्रकारांपैकी एक आहेत. भारतातील प्रथम लिथोप्रेस सुरू करणाऱ्या राजा रवी वर्मांचा इतिहास बघितला तर असे लक्षात येते की, बडोद्याचा राजाश्रय आणि सर टी. माधवराव यांच्या मदतीमुळे राजा रवी वर्मांच्या सुवर्ण कारकीर्दीत व नावलौकिक मोलाचा वाटा आहे. या दोघांच्या सढळ मदतीने राजा रवी वर्मा बडोदा संस्थानात नव्हे तर जगभरातल्या चित्रकलेच्या प्रांगणात प्रसिध्दी पावले.
 पुण्यात एक चित्र प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनात टी. माधवरावांनी राजा रवी वर्माचं 'नायर ' स्त्रीचे तैलचित्र पण ठेवले होते. एक दिवस राजा रवी वर्मांना एक तार आली, “ पुण्याच्या प्रदर्शनात ठेवलेल्या आपल्या नायर स्त्रीच्या चित्राला बडोदा महाराजांचं सुवर्णपदक मिळाले आहे." टी. माधवरावांचा आणि राजा रवी वर्माचा खूप जुना स्नेह होता. त्रिवेंद्रमच्या त्रावणकोरच्या राजघराण्यात राजे आईल्यम तिरूनाल यांच्याकडे दिवाण आणि त्यांचे बंधू युवराज विक्रम यांच्यासाठी

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / १६