पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पालक म्हणून टी. माधवरावांची नेमणूक केली होती. राजा रवी वर्मांनी चित्रकलेचे खरे धडे याच राजघराण्यात घेतले होते. राजे आईल्यम खूप उदार व कलावंत मनाचे राजे होते. त्यांनी राजा रवी वर्माला त्यांची चित्रकला बहरण्यासाठी राजदरबारात ठेवून घेतले होते. रवी वर्मा वीस वर्षाचे असताना इंग्रज चित्रकार थीओडोर जॉन्सन यांना १८६८ मध्ये त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आमंत्रित केले होते. जॉन्सन व राजदरबारचे चित्रकार रामस्वामी नायडू या दोघांच्या चित्रांचा रवी वर्मा यांच्यावर प्रभाव पडला. थओडोर जॉन्सन यांनी हाताळलेले तैलरंग हे माध्यम त्या काळी भारतीय कलापरंपरेला नवीनच होते. तरुण रवी वर्मांच्या पुढे या माध्यमामुळे एक नवीन विश्वच उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी हे माध्यम आत्मसात करून, त्यात विलक्षण प्रभुत्व संपादन केले. परदेशी चित्रकार तैलरंगाचे चित्रे बनवत असत. तिपाईवर कॅन्व्हास ठेवून ते चित्र रेखाटत असत. त्यांचा कॅन्व्हास हा ज्यूटचा असे. भारतात ही पद्धत कुणालाही ठाऊक नव्हती. राजा रवी वर्मा यांनी पहिल्यांदा ही पद्धत शिकली आणि भारतात तिचा प्रसार केला. चित्रकार थिओडोर जॉन्सन यांच्याकडूनच रवी वर्मा यांनी पोट्रेट बनवण्याची कलाही शिकली.

 त्यामुळे टी. माधवरावांना राजा रवी वर्मांची चित्रकार म्हणून कारकीर्द चांगली ठाऊक होती. इ.स. १९०४ मध्ये, भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी राजा रवी वर्माला 'केसर-इ- हिंद' या सुवर्णपदकाने सन्मानित केले. त्यावेळेस त्याचे नाव

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / १८