पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्सुक होते, पण हे कारण त्यांनी महाराजांच्याच तोंडून ऐकावे असे टी. माधवरावांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी सायंकाळी महाराजांना भेटण्याची वेळ निश्चित केली. त्यावेळेस टी. माधवराव राजा रवी वर्मा यांना म्हणाले, “ मी एवढच सांगतो की मी जरी बडोद्याच्या सेवेतून निवृत्त झालो आहे; वयानं मोठा असलो, तरी हा राजा जुने संबंध विसरत नाही. या राजाच्या सहवासात आलेली माणसं त्यालाही कधी विसरू शकत नाही. असं ते वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. राजाजी, हा राजा अतिशय वक्तशीर आहे. संध्याकाळची पाचची वेळ त्यांनी दिली आहे. त्याआधी आपण तयार असावे, ही विनंती.”
 बरोबर साडेचार वाजता रवी वर्मा आणि राज वर्मा दिवाणखान्यात आले. तेव्हा माधवराव त्यांच्या आधीच तेथे हजर होऊन त्यांची वाट बघत बसले होते. महाराजाच्या सचिवांनी तिघांचे स्वागत केले आणि बरोबर पाच वाजता सयाजीराव महालात आले. त्यांनी डोक्यावर गुजराथी पगडी, अंगात रेशमी शेरवानी, पायात चुडीदार विजार आणि राजपुती मोजडी घातलेली होती. बडोद्याचे महाराजा असूनही गळ्यात फक्त एक मोत्याची माळ सोडून एकही राजभूषण त्यांच्या अंगावर नव्हतं. त्यांच्या कपाळी गंधाचा टिळा होता. आपल्या विशाल डोळ्यांनी ते सर्वांना निरखून पाहत होते. रवी वर्मांना पाहताच, ते अगत्यानं पुढे आले. राजा रवी वर्माचा हात आपल्या हातात घेत म्हणाले, “राजेसाहेब आपल्याला भेटायची खूप इच्छा होती, आम्ही

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / २४