पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ८. हरिश्चंद्र तारामतीच्या वधास उद्युक्त झाला आहे.
 ९. राधा माधव
 १०. भरत
 ११. कंस आणि माया
 १२. यतिवेषधारी अर्जुन आणि सुभद्रा
 १३. नलदमयंती
 १४. द्रौपदी वस्त्रहरण
 इतिहासात, आज आणि नंतर कित्येक वर्षे राजा रवी वर्माचा वरील चित्रसंग्रह म्हणजे राष्ट्राचा एक अमूल्य खजिना म्हणून स्मरणात राहणार आहे. खुद्द राजा रवी वर्माच्या हातचा अस्सल चित्रांचा एवढा मोठा संग्रह बडोदा आणि म्हैसूरशिवाय कोणत्याही ठिकाणी उपलब्ध नाही.

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ३४