पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजा रवी वर्माला ह्रदयस्पर्शी निरोप
 राजा रवी वर्मांचे बडोद्यातलं काम संपलं होतं. तरीही महाराजांच्या आग्रहाखातर त्यांचं बडोद्यातलं वास्तव्य वाढलं होतं. राजा रवी वर्मा यांचा निरोप समारंभ ठरला. यासाठी सयाजीरावांनी खास दरबार भरविला होता. नव्या दिवाणांसह, खासे मंडळी आणि सरदार मंडळी त्या दरबारात उपस्थित होती. दरबाराच्या मध्यस्थानी राखीव आसनांवर रवी वर्मा, राज वर्मा स्थानापन्न झाले होते. महाराज सिंहासनावरून उठले आणि म्हणाले, “राजा रवी वर्मा, आमच्या इच्छेनुसार आपण दरबारमहालासाठी जी चित्रे तयार केलीत, ती पाहून आम्ही आनंदी झालो आहोत. आम्हीच नव्हे तर बडोद्यातील जनतेनेही या चित्रांची मनसोक्त स्तुती केली आहे. या चित्रकृतींबद्दल आपल्याला पन्नास हजार रुपये (आजच्या २०२१ च्या सोन्याच्या दरानुसार त्याची किंमत १३ कोटी इतकी होते) कलाधन आणि मानवस्त्र भेट देत आहोत, त्याचा प्रेमाने स्वीकार करावा. "
 खरंतर दिवाणांनी किंवा खास सचिवांनी करायचं भाषण महाराजा सयाजीरावांनी स्वतःच केलं. राजा रवी वर्मा यांच्या प्रेमापोटी त्यांना त्यावेळेस राहवले गेले नाही आणि त्यांच्या निरोप समारंभाची सूत्रे नकळत त्यांनी स्वतः हातात घेतली. त्यानंतर राजा रवी वर्मा यांना चांदीच्या तबकात सर्व नजराणा भेट दिला गेला. राजा रवी वर्मा यांचे डोळे भरून आले. त्यांनी

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ४२