पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शांतपणे नजराणा स्वीकारला. राजा रवी वर्मा आणि राज वर्मा यांना सन्मानाने मानवस्त्र दिली गेली, अत्तर, गुलाब दिले, मानाचे विडे देऊन दरबार संपला.
 राजा रवी वर्मांचा बडोद्याहून निघण्याचा दिवस उजाडला होता. सामानाची बांधाबांध चालली होती. राज वर्मा सर्व गोष्टी जातीने ठेवीत होते आणि त्यावेळेस अचानक दरवाजामध्ये खुद्द महाराजा सयाजीराव अवतरले आणि एकच गोंधळ उडाला. राजा रवी वर्मा धोतर आणि पंचा एवढ्याच अंगावरच्या कपड्यावर सामानाची आवराआवर करत होते. कपडे बदलण्याचेही त्यांना सुचले नाही. डोक्यावर पगडी नाही, अंगात सदरा नाही अशा वेशातल्या राजा रवी वर्मा यांना पाहून महाराजांना हसू आले. महालाच्या प्रवेशद्वारातच दोघांची गाठ पडली. रवी वर्मांनी लगेच खांद्यावरचे उपरणे जमिनीवर टाकले. गळ्यातलं जानवं कोपराखाली आणलं आणि नम्र भावानं महाराजांना वंदन केलं. रवी वर्मा मनात पूर्ण गोंधळले होते. महाराज तसे शिस्तप्रिय. वेळेचे महत्त्व जपणारे! प्रत्येक क्षण कामात घालवणारे. मुलाखतीची वेळ ठरल्याशिवाय कुणाचीही भेट न घेणारे. हे महाराजा न सांगता, न कळविता अचानक दारी का आले? या विचारातून भानावर येत असता महाराजांनी रवी वर्मांचं उपरणं जमिनीवर पडल्याच लक्षात आणून दिलं. त्यावर रवी वर्मा म्हणाले, “नाही महाराज, हा आमचा दक्षिणी रिवाज आहे.! जेव्हा गुणी, श्रेष्ठ माणसाचं दर्शन घडतं, तेव्हा आपली मानवस्त्र उतरून आम्ही

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ४३