पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांना वंदन करतो. त्यासाठी हा पंचा खाली टाकला आहे आणि जानवं हातावर घेतले आहे.” राजा रवी वर्मा महाराजांपेक्षा १५ वर्षांनी मोठे होते. त्यामुळे महाराज म्हणाले, “आपण आमच्यापेक्षा वयानं मोठे आहात.” त्यावर रवी वर्मा उत्तरले, "वय आणि अधिकार याचं गणित कधीच जुळलं नाही. तरुण शंकराचार्यांच्या पुढे वयोवृध्द वेदपारंगत कुमारिल भट्टांनी नाही का शरणागती स्वीकारली?” यावर सयाजीराव काही बोलले नाहीत. राजा रवी वर्माचा हात आपल्या हातात घेत म्हणाले, " आज आम्ही आमचा रिवाज मोडला. त्याची जाणीव आम्हाला आहे.; पण आज आपण जाणार या कल्पनेन मन बेचैन झाले आहे. आपल्यासारखी माणसं सदैव अवतीभोवती असावीत असे वाटते आम्हाला. आमच्या या राजेशाही जीवनात मुभा असती तर तुम्हाला स्टेशनवर सोडायला आम्ही नक्की आलो असतो. आज आपल्याला निरोप देताना एक भेट आणली आहे. त्याचा स्वीकार करावा. "
 दरबाराच्या निरोप समारंभात आधीच भरघोस भेट मिळाल्याने राजा रवी वर्मांना आता कोणतीही भेट सामान्य वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे त्यांना महाराजांकडून अधिक काही नको होते; पण महाराजांनी राजा रवी वर्मांसाठी अशी भेट आणली होती की, खुद्द राजा रवी वर्माही ती नाकारू शकत नव्हते. सयाजीरावांनी टाळी वाजवली आणि त्यांचा सेवक हातात तबकं घेऊन हजर झाला. राजा रवी वर्मांनी तबकाकडे पाहत विचारले, 'काय

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ४४