पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे पत्र वाचून होताच राजा रवी वर्माला अश्रूंना आवरता आले नाही. या थोर राजाच्या प्रेमादराने त्यांच्या दोन्ही डोळ्यांना धारा लागल्या.
मुंबईत “द रवी वर्मा फाइन आर्ट लिथोग्राफकी प्रेस "
 १८९३ ला ते मुंबईला गेले आणि १८९४ ला त्यांनी भारतातली पहिली "द रवी वर्मा फाइन आर्ट लिथोग्राफकी प्रेस" उभारली. यावर पहिली प्रिंट ‘शकुंतला जन्म' या पेंटिगची काढली गेली. भारतात पहिल्यांदा ऑईल पेंटिंग या प्रकारच्या पेंटिगची सुरुवात राजा रवी वर्मांनीच केली. राजा रवी वर्माने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्यांनी काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात.

 १८९६ नंतर महाराष्ट्रातील राष्ट्रवादाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून रवी वर्मा यांनी त्यांच्या प्रेसमध्ये राष्ट्रीय नायक, जसे शिवाजी महाराज, टिळक, रानडे यांचे ओलिओग्राफ्स छापले. asianच्या राजाश्रयानंतर अनेक संस्थानिकांनी राजा रवी वर्मा यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पौराणिक कथांवर आधारित चित्रे रंगविण्याची जबाबदारी सोपवली. यावरून असे लक्षात येते की, बडोद्याचे राजाश्रय आणि सर सर टी. माधवराव यांनी राजा रवी

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ४७