पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
राजा रवी वर्मा

 महाराजा सयाजीराव गायकवाडांनी ललितकलेतील गायन आणि मूर्तिकलेबरोबर चित्रकलेलाही खूप उत्तेजन दिले. चित्रकला ही ललितकलेत प्रमुख कला मानली जाते, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. सयाजीराव महाराज स्वतः प्रज्ञावंत साहित्यिक तसेच सर्जनशील कलाकारांचे पोशिंदे होते. त्यामुळे त्यांनी शिक्षणाबरोबर देशी भाषेत साहित्यानिर्मिती आणि ललितकलेची प्रगती यासाठी मोठे योगदान दिले. दाजी नागेश आपटेंनी श्रीसयाजीगौरवग्रंथात, साहित्य आणि ललितकला या लेखात सयाजीरावांचे ललितकलेविषयी असलेले प्रेम आणि आस्था याविषयी सविस्तर लेखन केले आहे. एका सुंदर इंग्रजी कवितेत म्हटल आहे.

Straight is the line of duty,
Curved is the line of beauty.
Follow one and then shalt see
The other following thee.

(William MacCall, Duty)

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ७