पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजांच्या ५८ वर्षांच्या कारकीर्दीत तब्बल २८ वर्षे महाराज परदेशात राहून राज्यकारभार करत होते. हे वास्तव विचारात घेतले तर शिवरायांनी गुणी आणि ज्ञानी लोकांची एक फौज उभी करून स्वराज्याचे स्वप्न सुराज्यासह साकारले. शिवरायांप्रमाणे सयाजीरावांनी आपल्या प्रशासनाच्या सर्वच विभागात प्रामाणिक, ज्ञानी, प्रचंड कष्टाळू आणि प्राणाची आहुती देण्याची तयारी असणारे खासेराव जाधव यांच्यासारखे अधिकारी निर्माण केले. प्रसंगी भारताबरोबर जगभरातून विविध क्षेत्रातील अव्वल लोक बडोदा प्रशासनात आणले, त्यांना पूर्ण अधिकार दिले, त्यांचे न आवडणारे सल्ले ऐकले आणि अमलात आणले. त्यामुळेच महाराज परदेशात राहूनसुद्धा या अव्वल दर्जाच्या प्रशासन यंत्रणेच्या जोरावर उत्तम राज्यकारभार करू शकले.

 सत्यशोधक धामणस्कर, खासेराव जाधव, वासुदेव लिंगोजी बिर्जे, दामोदर सावळाराम यंदे, नानासाहेब शिंदे, आर. एस. माने-पाटील, योगी अरविंद, एफ. ए. एच. इलियट, रोमेशचंद्र दत्त, मणिभाई देसाई, लक्ष्मण वैद्य, काझी शहाबुद्दीन, जयसिंगराव आंग्रे, पेस्तनजी दोराबजी, अप्पासाहेब मोहिते, टेकचंद, मि. सेडन, सत्यव्रत मुखर्जी, अमेरिकन अर्थतज्ज्ञ व्हाईटनेक, अमेरिकन ग्रंथालय तज्ज्ञ बॉर्डन, कलाभवन उभे करणारे टी. के. गज्जर, ए. जे. विजेरी, बिनोयतोष भट्टाचार्य ही काही उदाहरणे यासंदर्भात सांगता येतील.<br.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / ७