पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांच्या धोरणातील सूक्ष्म नियोजन आणि दीर्घकालीन उपाययोजना यांचा प्रत्यय येतो. तो नमुना पुढीलप्रमाणे -
सयाजीराव तिसरे डायमंड ज्युबिली ट्रस्ट फंड
 १९३६ मध्ये सयाजीराव महाराजांच्या राज्याधिकार हीरक महोत्सवानिमित्त या फंडाची स्थापना महाराजांनी केली. समाजविकास आणि मुख्यत: आदिवासी आणि अस्पृश्य यांच्या उन्नतीसाठी एक कोटी रुपयाचा निधी महाराजांनी आपल्या खाजगी फंडातून राखून ठेवला होता. या निधीच्या व्याजातून खेड्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचे उपक्रम राबवले जात होते.
I) उद्दिष्टे
 १) बडोदा संस्थानातील असा मागासलेला विभाग की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्याच्या विकासासाठी उपक्रम राबविणे.
 २) अस्पृश्य व रानीपरंज, ठकारडा, कोळी व राबडी इ. आदिवासी जमातींच्या विकासासाठी प्रयत्न करणे.
II) ट्रस्ट बोर्ड आणि घटना
 या बोर्डची घटना १९३६-३७ मध्ये तयार करण्यात आली. या बोर्डाचे एकूण १९ सदस्य होते. त्यापैकी ११ संस्थानातील अधिकारी तर ४ जिल्हा लोकल बोर्डाचे प्रतिनिधी, २ धारा सभा प्रतिनिधी आणि २ सदस्य हे मागासवर्ग व मागास प्रदेशाचे

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / १३