पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ब) मागासवर्ग विभाग - यामध्ये अस्पृश्य, आदिवासी इ.च्या विकासासाठी ५० हजार रु. देण्यात आले.
 क) मुख्यालयातील योजना - ग्रामीण लोकसंख्येचा मोठ्या घटकासाठी ५० हजार रु. निधी देण्यात आला.

VII) १९३७-३८ मधील मंजूर कार्यक्रम

 या वर्षात २ लाख ७०५ रु. च्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. ही रक्कम संस्थानातील २११ खेड्यांवर खर्च झाली.

VIII) कुटीर उद्योग

 यामध्ये कुटीर उद्योग प्रशिक्षण संस्था व कुक्कुटपालन उद्योग यांचा समावेश होता. कुटीर उद्योग प्रशिक्षण संस्थेने स्पिनिंग अँड विव्हिंग, डाईंग आणि कलिको, प्रिंटिंग इ. चे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन उद्योगासंदर्भा प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या वर्षी १० शेतकऱ्यांनी कोसंबा केंद्रातून प्रशिक्षण घेऊन आपले उद्योग सुरू केले.

IX) ग्रामीण रेडिओ केंद्र

 ग्रामीण रेडिओ प्रसारण केंद्राची योजना तयार करून ती कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

X) योजनेची अंमलबजावणी

 या फंडाचा सर्व ग्रामीण लोकांना उपयोग होण्यासाठी ग्रामपंचायती आणि तत्सम सेवाभावी संस्थांचा या योजनांच्या

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / १६