पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंमलबजावणीमध्ये सहभाग करून घेतल्यास फायद्याचे होईल.

 (टीप: वरील विश्लेषणातील निधीची रक्कम ही १९३६-३७ या एका वर्षातील आहे.)
२) डायमंड ज्युबिली पीपल्स फंड

 १९३६ मध्ये सयाजीराव महाराजांच्या राज्याधिकार हीरक महोत्सवानिमित्त या फंडाची स्थापना उस्फूर्तपणे लोकसहभागातून झाली. स्थापना वर्षी लोकसहभागातून ७ लाख रु. इतका निधी जमा करण्यात आला. या रकमेच्या व्याजातून वर्षाला २५ हजार रु. उत्पन्न मिळत असे. त्यातून शेती व शेतीपूरक व्यवसायांचे प्रात्यक्षिक शिक्षण देण्यात येत होते. यातील ठराविक रक्कम बाजूला काढून त्यातून खादी उत्पादक संस्थांना साहाय्य दिले जात होते. १९४०-४१ मध्ये एकूण १६ संस्थांना १,७५१ रु. मदत देण्यात आली. याच वर्षी १३८ शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यासाठी ३,९९३ रु. शिष्यवृत्ती देण्यात आली. ३० शेतकऱ्यांना संस्थानच्या प्रायोगिक शेतीकेंद्रांवर भेटीला नेऊन त्यांना प्रगत शेतीचे प्रशिक्षण दिले. ४४ विद्यार्थ्यांना ३,६७२ कुटीर उद्योग शिष्यवृत्ती देण्यात आली.
३) डायमंड ज्युबिली पीपल्स व्हिलेज अपलिफ्टमेंट फंड

 १९३६ मध्ये सयाजीराव महाराजांच्या राज्याधिकार हीरक महोत्सवानिमित्त या फंडाची स्थापना करण्यात

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / १७