पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कृषी क्षेत्र संभ्रमात सापडले असताना सयाजीरावांची ही दूरदृष्टी आपल्याला मार्गदर्शक ठरते.

 भारतातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी परदेशी संशोधनाचा उपयोग करत असतानाच आपल्या मर्यादांचा विचार करण्याचा 'विवेक' सयाजीराव महाराजांनी जाणीवपूर्वक जोपासला. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भारतातील कृषी आणि उद्योग क्षेत्रांचा समन्वय साधून विकास करत असताना पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण शक्य नसल्याची भूमिका मांडताना ५ मे १९०० रोजीच्या बडोद्यातील ओरसंग इरिगेशन वॉटर वर्क्सच्या उद्घाटन कार्यक्रमात सयाजीराव म्हणतात, “हिंदुस्थानला मात्र कितीही इच्छा असली तरी इंग्लडप्रमाणे केवळ धंद्यांचा अवलंब करता येणार नाही. तथापि एकट्या शेतीच्या पायी आज आपण देशाची सर्व शक्ती सर्वस्वी जी वाहात आहोत ती परिस्थिती बदलली पाहिजे. दारिद्र्यातून वर येऊन जगातील मोठमोठ्या व्यापारी राष्ट्राच्या पंक्तीला बसणाऱ्या जर्मनी व जपान या राष्ट्रांचीच उदाहरणे आपणाला या कामी उद्बोधक होतील.” २१ व्या शतकात सर्व बाजूंनी अडचणीत सापडलेल्या भारतीय कृषी क्षेत्राला सयाजीरावांची ही 'विवेकी' दृष्टीच तारू शकेल.

बडोद्यातील कृषी खाते आणि शेतीविषयक सुधारणा 

 सयाजीराव महाराजांनी १८९७ मध्ये इंग्लंडहून उच्च शिक्षण घेऊन परतलेल्या खासेराव जाधवांच्या नेतृत्वाखाली बडोद्यात

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / २०