पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांनी राज्यातील शेतकी खात्याच्या कामकाजाविषयी जे सांगितले ते ऐकून मला फार संतोष झाला. शेतकी वगैरे खाती रयतेच्या सुखासाठी असतात. आपल्या देशाचा मुख्य धंदा म्हणजे शेती. शंभरापैकी ऐशी माणसे शेतकी करतात. तेव्हा आपली सर्व मदार शेतीवर आहे. शेतकीखाते करीत असलेले प्रयत्न यशस्वी झालेले पाहून मला आनंद वाटतो आणि हा आनंद आणखी जास्त वाढेल अशीही मला आशा वाटते. शेतीची सुधारणा करण्यासंबंधी माझे विचार आजकालचे नसून त्यांना पंधरावीस वर्षे झाली आहेत. त्या वेळेपासून मी याविषयी प्रयत्न करीत आहे."

 १८९९ च्या दुष्काळात महाराजांनी आपल्या दुष्काळग्रस्त प्रांताचा स्वतः पाहणी दौरा केला. या दौऱ्यातील नोंदी १९०१ मध्ये महाराजांनी पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या. त्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत. या दुष्काळात महाराजांनी काढलेले ४८ आदेश त्यांच्यातील 'मातृहृदयी' राजाचे दर्शन घडवतात.

१८९९ च्या दुष्काळ दौऱ्यादरम्यान सयाजीराव महाराजांनी काढलेले आदेश 

 १) दुष्काळी कामावर जाण्यात कमीपणा वाटणाऱ्या भूमिहीन व मालमत्ताहीन लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तीस रुपयांपर्यंतची रक्कम विनातारण तगाई कर्जरूपाने देण्याचा आदेश.

 महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / २३