पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तयार करण्यासाठी सुरू केलेल्या प्रशिक्षणवर्गात सैन्यातील कर्मचाऱ्यांना हजेरीपत्रकातील नोंदी ठेवण्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले.

 ११) शारीरिकदृष्ट्या दुर्बल मजुरांचे वर्गीकरण करून वेगवेगळ्या वर्गातील मजुरांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे कामे देण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश.

 १२) चौदा वर्षाखालील मुलांना साप्ताहिक आणि सर्व मजुरांना अमावास्या व पौर्णिमेला पाक्षिक सुट्टी देण्याचा आदेश.

 १३) कडी, बडोदा आणि अमरेली या सुभ्यांतील मदतकार्य सुरू असलेल्या ठिकाणी नवजात बालके आणि विकालांगांसाठी तात्पुरत्या राहुट्या उभारण्यासाठी ४,००० रु. ची तरतूद करण्याचा आदेश. १४) मदतकार्यातील कामगारांच्या तक्रारी आणि दौऱ्यादरम्यान महाराजांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याचा मंत्र्यांना आदेश.

 १५) शेतसारा वसुलीसाठी कोणत्याही कठोर उपाययोजना करण्यास प्रतिबंध घालणारा आदेश.

 १६) शेतकऱ्यांवर कोणताही दबाव न आणता उत्पन्नाची साधने उपलब्ध असणाऱ्या व जमिनीत थेट गुंतवणूक असणाऱ्या लोकानांच शेतसारा भरण्यासाठी बोलावण्याचा अधिकाऱ्यांना आदेश.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / २६