पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३५) शिधा कपातीची शिक्षा झालेल्या कैद्यांचा वैद्यकीय देखरेखीचा कालावधी सामान्य परिस्थितीत दोन ते तीन आठवड्यांपेक्षा अधिक न ठेवण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश.

 ३६) गरजेनुसार गरीबखान्यातील रहिवाशांना देण्यात येणाऱ्या आहारात योग्य तो बदल करण्याचा आदेश.

 ३७) दुष्काळग्रस्तांना काम उपलब्ध करून देण्यासाठी कोसंबा वाकल या तीन मैल लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम कोणत्याही सर्वेक्षणाविना सुरू करण्याचा आदेश.

 ३८) दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होऊन जंगली उत्पादनांपर्यंत पोहोचणे शक्य व्हावे यासाठी जंगलातील रस्ते बांधण्याचा आदेश.

 ३९) सोनगड विभागातील गरीबखान्याच्या खर्चासाठी १०,००० रु. मंजूर करणारा आदेश.  ४०) नवसारी विभागातील दुष्काळ जाणवणाऱ्या ठिकाणी लोकांना दिलासा देणारे उपक्रम मोफत राबवण्याचा आदेश.

 ४१) कालीपरज आदिवासी जमातीच्या करमाफीच्या मागणीबाबत संबंधित विभागाला परिस्थिती पाहून कार्यवाही करण्याचा आदेश.

 ४२) नवसारी विभागात चालू असलेल्या दुष्काळी कामांमध्ये धनका, चोंधार, नाईकदास, भिल्ल आणि कोकणी जमातींसाठी कामे चालू करण्यास मंजुरी.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ३०