पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ४३) ६,००० रुपयांपेक्षा कमी खर्चाचा कोणताही दुष्काळग्रस्तांसाठीचा उपक्रम राबवण्याचा अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना प्रदान करणारा आदेश.

 ४४) बांबूच्या चकत्यांपासून चटया आणि मदतकार्यासाठीच्या राहुट्या तयार करण्याच्या कामासाठी ६,००० रु. निधी मंजूर केल्याचा आदेश.

 ४५) सोनगड येथील लोकांसाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचा आदेश.

४६) व्यारा आणि महुआ जिल्ह्यातील शेतकरी क्यारी (छोटे चौकोन करून) पद्धतीने शेतात पाणी जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते. दुष्काळी कामाच्या योजनेंतर्गत हे काम करण्यासाठी या दोन जिल्ह्यांकरता ३०,००० रु. मंजूर केल्याचा आदेश. कडी आणि बडोदा विभागाप्रमाणेच या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्याचे अधिकार नायब सुभा आणि वहिवाटदारांना देण्यात आले.

 ४७) सुभा अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पूर्व नवसारी जिल्ह्यासाठी तगाईची आगाऊ रक्कम म्हणून ३०,००० रु. मंजूर केल्याचा आदेश. संपूर्ण राज्यातील नवीन विहिरींसाठी आधीच मंजूर केलेल्या २५,००० रुपयांच्या सर्वसाधारण निधीला जोडून ही रक्कम देण्यात आली.

 ४८) नवसारी जिल्ह्यातील दुष्काळात दारिद्र्याने ग्रासलेले अनेक प्रतिष्ठित लोक कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ३१