पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भावनेमुळे दुष्काळी कामांवर जात नव्हते. या लोकांची उपासमार होऊ नये आणि त्यांचा उदरनिर्वाह चालावा या हेतूने त्यांच्यासाठी १५,००० रु. तगाईची आगाऊ रक्कम देण्याचा आदेश. याशिवाय गवत खरेदीसाठी १५,००० रु.ची अतिरिक्त तगाई मंजूर केली.

बडोद्यातील कृषी प्रदर्शने

 कृषिविषयक अत्याधुनिक ज्ञानाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी सयाजीरावांनी कृषी प्रदर्शनांचा अत्यंत हुशारीने उपयोग करून घेतला. १८८१ मध्ये राज्याधिकार प्राप्तीच्या समारंभावेळीच कृषी प्रदर्शनाचे आयोजन करून सयाजीरावांनी या प्रक्रियेची पायाभरणी केली. १८८५ मध्ये नडियाद येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला महाराजांनी १००० रुपयांची आर्थिक मदत केली. १९०४ मध्ये कलकत्ता येथे मांडलेल्या भूमिकेनुसार सयाजीरावांनी कृषी प्रदर्शनांमध्येदेखील शेती आणि औद्योगिक शिक्षणाची सांगड घातली.

 १९१७ मध्ये बडोद्यात झालेल्या कृषी औद्योगिक प्रदर्शनासाठी सयाजीरावांनी १२,५०० रुपयांची तरतूद केली होती. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम सुमारे ३ कोटी ६६ लाख रुपयांहून अधिक भरते. कृषी, उद्यान शास्त्र, वने, शिक्षण आणि उद्योग या पाच विभागांमध्ये या प्रदर्शनाची विभागणी करण्यात आली होती. प्रदर्शनामध्ये समाविष्ट सर्व घटकांची विस्तृत माहिती देणारे गुजराती आणि इंग्रजी

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ३२