पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीराव आणि कृषिविषयक उच्चशिक्षण

 शेतकऱ्यांमधील निरक्षरता हे त्यांच्या आजवरच्या अधोगतीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच सयाजीरावांनी आपल्या कारकीर्दीत बडोद्यातील शेतकऱ्यांना कृषिविषयक अद्ययावत ज्ञान देण्याचा सातत्याने प्रयत्न के ला. शेतीसबं ंधीचे आधुनिक ज्ञान मिळवण्यासाठी महाराजांनी अनेक होतकरू विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने शिष्यवृत्ती देऊन परदेशात पाठवले. उच्चशिक्षित विद्यार्थी परदेशातून परतल्यानंतर त्यांच्या ज्ञानाचा ससं ्थानाला फायदा व्हावा यासाठी त्यांना बडोद्यात काही काळ नोकरी करणे सयाजीरावांनी बंधनकारक के ले. याच योजनेचा लाभ घेत १८८४ मध्ये खासेराव जाधव सयाजीरावांचे लहान बंधू सपं तराव यांच्याबरोबर उच्च शिक्षणासाठी इगं ्लंडला गेले. इगं ्लंडमध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात पदविका शिक्षण घेतले. शेतकऱ्यांना शेतीचे परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी आतुर झालेल्या सयाजीरावांनी ‘आपण बडोद्यात कृषी विद्यालय स्थापन करत असनू डिप्लोमाचे शिक्षण सपं ल्यानंतर लगेचच भारतात परतण्याची सच ू ना’ खासेरावांना २२ नोव्हेंबर १८८६ रोजी लिहिलेल्या पत्राद्वारे के ली. त्यानुसार आपले उच्च शिक्षण पूर्ण करून १८९० मध्ये खासेराव बडोद्यात परतले. बडोद्यात परतल्यानंतर खासेरावांनी शेतीमध्ये अत्याधुनिक परदेशी तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन दिले. शेती नांगरण्यासाठी जर्मनीहून ट्रॅक्टर मागवण्यात खासेरावांनी

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / 7