पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच शेताला पाणी देण्यासाठी विहिरीवर ऑईल इंजिन बसवले. परिणामी सयाजीरावांनी १८९७ मध्ये खासेरावांच्याच नेतृत्वाखाली बडोद्यातील स्वतंत्र कृषी खात्याची स्थापना केली.
 ऑक्टोबर १९९९ मध्ये सयाजीरावांनी खासेरावांप्रमाणेच रामचंद्रराव माने-पाटील यांना अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व कृषी विषयांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवले. रामचंद्ररावांनी युरोपातील डेन्मार्क, स्वीडन, जर्मनी, नॉर्वे इ. देशांचा प्रवास करून तेथील शेतीची प्रगती, जमीन महसूल पद्धती इ.चे सखोल ज्ञान मिळवले. त्याआधारे त्यांनी 'Consolidation of small and scattered agricultural holding in various countries of Europe' हा चिकित्सक प्रबंध लिहिला. परदेशातून परतल्यानंतर बडोद्यातील जमिनीची तपासणी करत असताना पडीक जमीन लागवडीखाली आणण्याची सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. माने-पाटलांच्या प्रयत्नामुळे ६४३ खेड्यांतील ३३,५६४ बिघे जमीन लागवडीखाली आली. त्यामुळे सरकारी तिजोरीत दरवर्षी २६,५६१ रु. ची भर पडू लागली.
 वंश परंपरेने जमिनीचे तुकडीकरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत होती. या पार्श्वभूमीवर त्यावेळच्या पंजाब प्रांतामध्ये लागू करण्यात आलेल्या शेतजमिनी एकत्रीकरणाविषयीच्या कायद्यांच्या

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ८