पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंमलबजावणीचा अभ्यास करण्यासाठी सयाजीरावांनी रामचंद्ररावांना पंजाबमध्ये पाठवले. रामचंद्ररावांनी या अभ्यासावर आधारित 'Land Administration in the Punjab' हा ग्रंथ प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी लागू करण्यात आलेल्या 'Punjab Land Alienation Act' व ‘Deccan Agriculture's Relief Act' या कायद्यांचे विश्लेषण करणाऱ्या या ग्रंथाचे अनेक कृषी तज्ज्ञांनी कौतुक केले. पंजाबमध्ये अमलात आलेल्या या कृषिविषयक सुधारणा बडोद्यात लागू करता येतील का याबाबतच्या सूचनादेखील माने-पाटलांनी सदर ग्रंथात नोंदवल्या होत्या. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संस्थानातील जनतेला साक्षर करतानाच इतर संस्थानातील सुधारणांचा चिकित्सक स्वीकार करण्याची सयाजीरावांची ‘गुणग्राहकता' आजही अनुकरणीय आहे.
 जाप्रवासाने सयाजीरावांना जगातील विविध देशांच्या शेती क्षेत्राची भारतातील शेतीशी तुलना करण्याची संधी मिळाली. त्यातून भारतीय शेतीची मूळ समस्या समजून घेणे महाराजांना शक्य झाले. त्यामुळेच त्यांचे शेती प्रश्नाचे चिंतनसुद्धा वास्तववादी होते. भारतीय शेतीचे आधुनिकीकरण हा भारताच्या आधुनिकीकरणाचा पाया आहे हे त्यांनी जाणले. म्हणूनच ते शेती क्षेत्राच्या विकासात पथदर्शक काम करू शकले. भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासंदर्भात त्यांनी वेळोवेळी मांडलेले विचार आजही चिंतनीय आहेत. नोव्हेंबर १९०४

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ९