पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विशेष. केतकरांना ज्ञानकोशाची कल्पना त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणादरम्यान तेथील अमेरिकेतील विश्वकोशाचे काम पाहून सुचली. त्यामुळे केतकरांच्या ज्ञानकोशाच्या कामाची प्रेरणासुद्धा सयाजीरावच ठरतात. विशेष म्हणजे शिष्यवृत्ती घेऊनही बडोद्यात नोकरी न करण्याच्या निर्णयानंतरसुद्धा पुढे सयाजीरावांनी या ज्ञानकोशांना आर्थिक पाठबळ दिले. ही बाब कोणताही पूर्वग्रह न ठेवता समाजोपयोगी कामाच्या मागे उभे राहण्याची महाराजांची विशाल दृष्टी दर्शवते.
द्वेषमुक्त सयाजीराव आणि विक्षिप्त केतकर

 १९०६ ची शिष्यवृत्ती, १९२७ च्या दरम्यान ज्ञानकोशाला केलेले साहाय्य विचारात घेता सयाजीरावांप्रती केतकरांची दृष्टी कृतज्ञ असायला हवी होती परंतु तसे दिसत नाही. कारण पुढे १९३२ मध्ये व्याख्याने देण्यासाठी महाराजांनी त्यांना बडोद्याला बोलवले. परंतु या भेटीत काही कारणाने महाराज व त्यांचे संबंध बिघडले. फारशी व्याख्याने न देता ते परतले. या भेटीत बडोदा विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली. पुण्याला परत आल्यावर केतकरांनी महाराजांना नोटीस पाठवली. याचा विस्तृत आढावा गोखलेंनी त्यांच्या केतकर चरित्रात घेतला आहे. तो त्यांच्याच शब्दात समजून घेणे मनोरंजक ठरेल. गोखले लिहितात, “१९३२ च्या फेब्रुवारी महिन्यात सयाजीराव महाराज गायकवाडांनी व्याख्याने देण्यासाठी त्यांना बडोद्यास बोलावले आणि बोलावण्याप्रमाणे शीलवतीबाईसह ते बडोद्याला गेले.

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / १७