पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेळी केतकरांनी सयाजीरावांना दिलेला आशीर्वाद होय. हा आशीर्वाद देताना केतकरांनी 'ब्राम्हण या नात्याने आपणास व आपल्या कुळास आशीर्वाद देतो' असे म्हणून दिला होता. यावरून केतकरांची आत्मश्रेष्ठीपणा दर्शवणारी मानसिकता स्पष्ट दिसून येते. केतकर आणि सयाजीराव हे नाते आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या चौकटीत तपासले असता केतकरांना महाराजांकडून मिळालेले साहाय्य आणि पाठबळ महत्त्वाचे होते. कारण जातीवरचे वस्तुनिष्ठ संशोधन हे जातीअंताचा कार्यक्रम तयार करण्यासाठी बाबासाहेबांसह संपूर्ण महाराष्ट्राला उपयुक्त ठरले. तर ज्ञानकोशासाठी केलेली मदत मराठी भाषेला 'ज्ञानभाषा' म्हणून श्रीमंत करून गेली. केतकरांच्या माध्यमातूनही 'बडोद्याची' ही 'सयाजीऊर्जा' महाराष्ट्राला बलशाली करण्यास उपयुक्त ठरली.

●●●
महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / २०