पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कृतीशील उपक्रम
 महाराजांनी १९९५ मध्ये 'गायकवाड ओरिएंटल सिरीज' ही संशोधनमाला सुरू करण्याचा निर्णय घेतला. या मालेत १९१६ मध्ये राजशेखर कृत 'काव्यमीमांसा' हा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. विविध महाकाव्ये, पुराणे, स्मृती, धर्मशास्त्र, काव्यशास्त्र, ज्योतिषशास्त्र, छंदशास्त्र अशा अनेक विषयांचे ग्रंथ संग्रहित करण्यात आले. महाराजांच्या आज्ञेवरून अनंतकृष्ण शास्त्री यांनी संपूर्ण भारतभर फिरून सात वर्षाच्या भ्रमंतीतून दहा हजार हस्तलिखिते जमा केली. १९३३ पर्यंत १३ हजार ९८४ हस्तलिखितांचा संग्रह बडोदा प्राच्यविद्या संस्थेकडे उपलब्ध झाला. हा संग्रह भारतातील सर्वोत्तम संग्रहांपैकी एक मानला जातो. यासाठी स्वतंत्र संस्था असावी असे महाराजांचे मत पडले आणि यातूनच १ सप्टेंबर १९२७ साली प्राच्यविद्या संस्थेची स्थापना करण्यात आली.

 सुरुवातीस ही संस्था बडोदे येथील मध्यवर्ती वाचनालयाचा एक भाग म्हणून कार्यरत होती पण पुढे तिचा विस्तार होत गेला. १९३१ मध्ये शिक्षण खात्यातील भाषांतर विभाग या संस्थेस संलग्न करण्यात आला आणि सामान्य प्रजेला ज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून उत्तम ग्रंथांचे स्थानिक भाषेत म्हणजेच गुजराती व मराठीत भाषांतर करण्याचे काम सुरू झाले. १९३२ अखेर महाराजांनी भाषांतर शाखेसाठी दीड लाख रुपये खर्च केले होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ४१ कोटी २५ लाख

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / १०