पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या चार विषयातील उपयुक्त पुस्तके, संस्कृतातून चांगली पुस्तके मराठीत लिहिण्याविषयी हुकुम देण्यात आला.” या भाषांतराच्या कामावर ३०० रु. दरमहाचा एक अधिकारी नेमून २९ ग्रंथ तयार करण्यात आले. ‘नितीकाव्यामृत', 'काव्यकल्पकता' ही पुस्तके प्रकाशित झाली.
 महाराजांनी मॅक्स मुल्लरने भाषांतरीत केलेल्या 'सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट' या मालेत प्रकाशित केलेल्या बारा उपनिषदांपैकी सात उपनिषदांचे मराठी अनुवाद करण्याचे काम केळूसकरांवर सोपवले.हे भाषांतर करत असताना केळूसकरांनी मॅक्समुल्लरच्या ऐवजी मूळ संस्कृत ग्रंथांवरून ते भाषांतर केले. विशेष म्हणजे या अनुवादात केळूसकरांनी मॅक्स मुल्लरचा कोठेही आधार घेतला नाही. फक्त उपनिषदांवरील शांकरभाष्यासाठी मात्र त्यांनी मॅक्स मुल्लरचा आधार घेतला. हे भाषांतरही परीक्षण समितीने उत्कृष्ट ठरवले. संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत असे भाषांतर करणारे केळूसकर हे पहिले ब्राह्मणेत्तर ठरतात. बारा पैकी उरलेल्या सहा उपनिषदांचे भाषांतर शंकर मोरो रानडे यांनी केले.
संस्कृत ज्ञानाचे उपयोजन

 वेदोक्त प्रकरण सुरु करण्यापाठीमागे महाराजांचा हेतू समाजातील उच्चनीचता कमी करून समानता प्रस्थापित करणे हा होता. यासंदर्भात सरदेसाई म्हणतात, “महाराजांच्या हुकुमावरून सर्व सोळा संस्कार विधींचे मराठी भाषांतर करून छापण्याचे काम मी केले; अर्थात हा एक नवीनच धर्म संशोधनाचा लाभ

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / १२