पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजातील सर्व घटकांना हे ज्ञान मातृभाषेत समजावे यासाठी परवानाधारक पुरोहितांना धार्मिक विधींचा शास्त्रार्थ यजमानाला मातृभाषेत समजावून सांगण्याचे बंधनकारक करण्यात आले. तसे न केल्यास २५ रुपये दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली. बहुजन समाजाची धर्मविषयक समज वाढावी हा यामागील प्रमुख उद्देश होता.
जागतिक फलनिष्पत्ती
 सयाजीरावांच्या या धर्मसाक्षरता जिवनव्रताचा सर्वोच्च सन्मान म्हणजे त्यांना देण्यात आलेले १९३३ च्या शिकागो येथील 'दुसऱ्या जागतिक धर्मपरिषदेचे अध्यक्षपद होय. १८९३ च्या पहिल्या धर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणातून दिलेली विश्वबंधुत्वाची साद भारताने ऐकली. मात्र १९३३ मध्ये त्याच शिकागोत अमेरिकेच्या गार्ड ऑफ ऑनर सलामीसह संपूर्ण जगाने सयाजीरावांना अध्यक्षपदाच्या रूपाने दिलेली मानवंदना भारताला कळली नाही हे आपले दुर्दैवच.

 संस्कृत भाषा आणि धार्मिक ज्ञान ही ब्राह्मणांची मक्तेदारी होती. पण कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी या भाषेपासून अनभिज्ञ अशा हिंदू धर्मातील व्यक्तींना संस्कृत भाषेचे ज्ञान देणे गरजेचे होते. संस्कृत शिक्षणाअभावी पुरोहित कायद्यातील तरतुदींचा लाभ घेणे शक्य नव्हते. विशेषतः अस्पृश्य जातींना संस्कृत शिक्षण देण्याची आवश्यकता होती. या कायद्याची पूर्वतयारी म्हणून २ वर्ष आधी १९१३ रोजी अस्पृश्यांसाठी संस्कृत

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / १६