पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाठशाळा सुरू करण्यात आली. पहिल्याच वर्षी या शाळेत २५ विद्यार्थी संस्कृत शिक्षण घेत होते. आधुनिक कालखंडात सयाजीराव हे पहिले राज्यकर्ते आहेत की ज्यांनी अस्पृश्यांना संस्कृत ज्ञानभांडाराची दारे खुली केली. १९१३ साली महाराजांनी अस्पृश्य जातीतील पुरोहितांसाठी गरोडा पाठशाळेची सुरुवात केली. त्यांना दरमहा ८ रु. शिष्यवृती देण्यात येत असे. या पाठशाळेचा अभ्यासक्रम कालावधी ३ वर्षाचा होता.
संस्कृत भाषेचे लोकशाहीकरण

 हिंदूंमधील सर्व जातीच्या लोकांना संस्कृत शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यामागील आपली भूमिका व्यक्त करताना १९१५ च्या भाषणात महाराज म्हणतात, “बडोद्यास पूर्वी संस्कृत शाळा होती परंतु तिचा जनसमूहाला व्हावा तसा उपयोग होत नसल्यामुळे ती बंद करावी लागली. आता विद्वान व प्रगल्भ विचाराचे शिक्षक मिळाल्यास ती शाळा पुन्हा सुरू करण्याचा माझा विचार आहे. या शाळेपासून सर्व लहान थोर वर्गाच्या लोकांना फायदा होईल अशी मला आशा आहे. ओघासच आले म्हणून सांगतो की विद्या व धर्मज्ञान सर्वांचे धन असल्यामुळे ते सर्वांना मिळण्यास अडचण असू नये. हिंदू लोकांना आपला धर्म व त्याची तत्त्वे याविषयी खरी माहिती नाही, असे म्हणण्यास हरकत नाही. ज्यात धर्माचे शिक्षण दिले जात नाही असा सुधारलेला देश कोठेही आढळावयाचा नाही.” आपल्या या

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / १७