पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यापारी व कारागीर वर्गाला पतपुरवठा करत होती. याच दरम्यान बडोदा मध्यवर्ती बँकेने धोरणात बदल करून आपले कार्यक्षेत्र बडोदा जिल्ह्यापुरते मर्यादित केले. या मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुमारे ९९ सहकारी संस्थांना पतपुरवठा केला गेला. यावरून मध्यवर्ती सहकारी बँकेचे महत्त्व अधोरेखित होते.

 १९१५-१६ मध्ये नवसारी सहकारी बँकिंग संघटनाशी ३६ सहकारी संस्था संलग्न होत्या. तसेच कोडीनार या तालुक्यातील कोडीनार सहकारी बँकिंग संघटनेमार्फत सहकारी संस्थांना पूरक कार्य केले जात होते. मेहसाना येथील लोकसुद्धा मध्यवर्ती बँक सुरू करण्याबाबत उत्साही होते. सयाजीराव महाराज शिक्षणाच्या बाबतीत किती सजग होते याचा प्रत्यय आपणास या बँकिंग संघटनाच्या व्यवस्थापकाच्या निवडीतून येतो. कारण या बँकांचे व्यवस्थापक हे कृषी विषयात पदवी प्राप्त केलेले होते. कृषी बँकेमार्फत फक्त सहकारी संस्थांना कर्जपुरवठा न करता वैयक्तिक खातेदारांनाही कर्जपुरवठा करण्याचे धोरण बडोद्यातील सहकार चळवळीचा कमालीचा सकारात्मक दृष्टिकोन स्पष्ट करते.

 बडोदा संस्थानात १९३८-३९ पर्यंतच्या कालखंडात संपूर्ण संस्थानातील सहकार चळवळीला अर्थ पुरवठा करण्याचे काम ८ प्रमुख पतपुरवठा संस्थांनी केले होते. जिल्हा स्तरावरील संस्था म्हणून बडोदा, मेहसाना व नवसारी जिल्हा सहकारी बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पेटलाड, कोडीनार व दामनगर

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / १३