पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येथील बँकांनी तालुकास्तरीय पतपुरवठा संस्था म्हणून सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणावर पतपुरवठ्याचे काम केले.

 बडोद्यातील मध्यवर्ती बँका आणि बँकिंग संघटनांनी सर्वसामान्य जनतेला आर्थिक साहाय्य करण्याची जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न केला. १९३७-३८ मध्ये या मध्यवर्ती बँका आणि बँकिंग संघटनांमध्ये सुमारे १५,३५,०८५ रु. चे खेळते भांडवल उपलब्ध होते. पुढील वर्षी १८३८-३९ मध्ये या रकमेत वाढ होऊन एकूण १६,९०,६५१ रु. चे खेळते भांडवल या बँकांमध्ये उपलब्ध झाले. या बँकाकडून त्यांच्याशी संलग्न सहकारी संस्थांना कर्जरूपाने पुरवलेली रक्कम १९३७-३८ मध्ये २,७८,९७९ रु. होती. पुढील वर्षी या रकमेत वाढ होऊन ३,३८,९२२ रु. एवढी रक्कम या बँकाकडून संलग्नित सहकारी संस्थांना उपलब्ध करून देण्यात आली.

कापूस विक्री संस्था

 १९२५-२६ मध्ये बडोद्यात ३ कापूस विक्री संस्थांची स्थापना करण्यात आली होती. यातील २ कापूस विक्री संस्थांकडून त्या वर्षी १,६५,५८० रुपयांच्या कापसाची विक्री करण्यात आली. व्यारा येथे कालीपरज लोकांसाठी स्वतंत्र सहकारी कापूस पुरवठा संस्थेची स्थापना केली. आदिवासींना सहकारी तत्त्वावर कापूस पुरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली भारतातील बहुधा ही पहिलीच संस्था असावी. या संस्थेमार्फत कालीपराज लोकांना १९२५-२६ या आर्थिक वर्षात ३,२२६ किमतीचे कापूस

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / १४