पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येथील या संस्थेची कामगिरी इतर संस्थांच्या तुलनेत अधिक समाधानकारक होती. दरवर्षी या संस्थेच्या कामकाजात प्रगती होत गेली.

 १९३८-३९ मध्ये पॉवर पंप संस्थांच्या माध्यमातून अधिकाधिक शेतजमीन ओलिताखाली यावी यासाठी बडोदा सरकारने या संस्थांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजदरांमध्ये १.५ % घट करून हे व्याजदर ५% वरून ३.५% वर आणले. या आर्थिक वर्षात पॉवर पंप संस्थांच्या माध्यमातून सहकारी तत्त्वावर पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून ४३७ बिघे जमीन ओलिताखाली आणली गेली.

८) सहकारी भांडारे

 संस्थानातील जनतेला विविध वस्तूंचा वेळेत पुरवठा व्हावा यासाठी सयाजीरावांनी १९२९ पासून सहकारी तत्त्वावरील भांडारांची सुरुवात केली. १९२९-३० मध्ये बडोद्यात ग्रामीण व नागरी भागात एकूण २६ सहकारी भांडारे स्थापन करण्यात आली. परंतु त्यापैकी केवळ १० सहकारी भांडारे उत्तमरीत्या कार्यरत होती. या सहकारी संस्थांनी विविध प्रकारच्या ८६,४९७ रु. किमतीच्या वस्तूंची विक्री करून सुमारे ३,८९७ रु. नफा कमवला. ग्रामीण आणि नागरी भागातील सहकारी भांडारांप्रमाणेच इतर प्रकारची भांडारे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / २४