पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आली. परंतु ग्रामीण भागात या सहकारी भांडारांमध्ये काम करण्यासाठी प्रामाणिक व इच्छुक कामगारांची अनुपलब्धता हा यामधील सर्वात मोठा अडथळा होता.

अ) ग्रामीण सहकारी भांडारे

 बडोदा संस्थानातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण शाश्वत आर्थिक विकास हे सयाजीरावांचे जीवनध्येय होते. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची प्रगती घडवून आणण्यासाठी १९३१ मध्ये सहकारी तत्त्वावरील ग्रामीण भांडारांची सुरुवात करण्यात आली.

ब) नागरी भांडारे

 ग्रामीण भांडाराबरोबरच शहरी जनतेला सहकारी तत्त्वावर विविध वस्तूंची खरेदी-विक्री करता यावी यासाठी १९३३ मध्ये बडोद्यातील शहरी भागात नागरी भांडारांची सुरुवात करण्यात आली. १९३३-३४ मध्ये बडोदा संस्थानातील शहरी भागात कार्यरत विविध नागरी भांडारांपैकी पुस्तकालय मंडळ, बडोदा किरकोळ वस्तू भांडार, ओखा पोर्ट भांडार आणि बडोदा दूध भांडार यांची प्रगती उल्लेखनीय होती. १९३८-३९ मध्ये पुस्तकालय मंडळाने ४२,२५९ रुपये किमतीची पुस्तक विक्री केली. पुस्तकालय मंडळीने सातत्यपूर्ण पुस्तक विक्रींच्या माध्यमातून बडोद्यातील ज्ञान चळवळीला मोलाचा हातभार लावला.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / २५