पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उर्वरित भारत आणि बडोद्यातील सहकार : तुलनात्मक आकलन

 स्वातंत्र्यपूर्व भारतात एकूण ५६५ संस्थाने अस्तित्वात होती. यापैकी जम्मू-काश्मीर, बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर, हैदराबाद, म्हैसूर, पुदुकोट्टा, कोचीन आणि त्रावणकोर या केवळ ९ संस्थानांमध्ये स्वतंत्र सहकार खाते अस्तित्वात होते. स्वतंत्र सहकार खात्याच्या माध्यमातून या संस्थानांनी आपल्या संस्थानातील सहकार चळवळीचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. या संस्थानांपैकी जम्मू-काश्मीरमध्ये सहकार खाते कृषी खात्याशी संलग्न होते. तर इंदूर संस्थानात ग्रामविकास खात्यांतर्गत एक विभाग म्हणून सहकार खाते कार्यरत होते. या ९ संस्थानातील सहकार खात्याच्या कार्याच्या गुणवत्तेचा अभ्यास जी.आर. पिलाई यांनी १९३३ मध्ये त्यांच्या 'Cooperation in Indian States' या ग्रंथात पुढीलप्रमाणे गटवार वर्गीकरण केले आहे.

 १) म्हैसूर व बडोदा

 २) त्रावणकोर, कोचीन व पुदुकोट्टा

 ३) जम्मू-काश्मीर

 ४) हैदराबाद

 ५) इंदूर व ग्वाल्हेर

 जी. आर. पिलाई यांनी केलेल्या वर्गीकरणानुसार म्हैसूर व बडोदा संस्थानातील सहकार खात्यांचे कार्य अत्यंत उत्कृष्टपणे चालू होते. स्वतंत्र सहकार खाते अस्तित्वात असलेल्या या

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ३५