पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लोकसंख्येचा विचार करता बडोदा संस्थानातील १० हजार लोकसंख्येमागील सहकारी संस्थांची घनता इतर सर्व संस्थानांपेक्षा अधिक होती. यामुळे संस्थानातील अधिकाधिक जनतेला सहकारी संस्थांची सुविधा उपलब्ध होणे शक्य झाले. तर १००० लोकसंख्येमागील सर्वाधिक प्राथमिक सहकारी संस्था सभासद त्रावणकोर संस्थानामध्ये होते. त्रावणकोर संस्थानाची एकूण लोकसंख्या विचारात घेता प्राथमिक सहकारी संस्थांची सभासद संख्या वाढणे क्रमप्राप्त होते.

भारतातील विविध प्रांत व संस्थानांतील प्राथमिक सहकारी संस्थेमागील लोकसंख्या दर

 १२ लाख लोकसंखेच्या कोचीन संस्थानातील प्राथमिक सहकारी संस्थांची संख्या केवळ २४६ इतकी होती. त्यामुळे कोचीनमध्ये सर्वाधिक ४,८७८ व्यक्तींमागे एक प्राथमिक सहकारी संस्था कार्यरत होती. बडोदा संस्थानात याच कालावधीत १,०६३ प्राथमिक सहकारी संस्था अस्तित्वात होत्या. २४ लाख लोकसंख्येच्या बडोदा संस्थानात २,२५७ व्यक्तींमागे एक प्राथमिक सहकारी संस्था होती. एका संस्थेवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची संख्या इतर सर्व संस्थानापेक्षा बडोद्यात सर्वात कमी होती. बडोदा संस्थानातील लोकसंख्येच्या तुलनेत प्राथमिक संस्थांचा झालेला संतुलित विकास वरील आकडेवारी अधोरेखित करते. २०२० च्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार २०१८-१९ मध्ये महाराष्ट्रात ५,४१६

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ३७