पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतातील विविध प्रांत व संस्थानांतील सहकारविषयक साहित्य प्रकाशन

 मुंबई प्रांतात काही अशासकीय व्यक्तींनी एकत्र येऊन 'मुंबई मध्यवर्ती सहकारी संस्थे'ची स्थापना केली. मद्रासमध्ये 'मद्रास प्रांत सहकार संघटना' प्रामुख्याने सहकारविषयक शिक्षण प्रसाराचे काम करत होती. बंगालमध्ये सहकार चळवळीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'बंगाल सहकारी सोसायटी' या संस्थेची स्थापना करण्यात आली. बडोदा संस्थानात सहकार चळवळ विषयक ज्ञानप्रसाराचे कार्य मुख्यतः शासकीय सहकार खात्याकडून केले जात असे. सहकार खात्यातील अधिकाऱ्यांच्या साहाय्याने 'ग्रामजीवन' नावाचे सहकार खात्याचे मुखपत्र असणारे त्रैमासिक नियमितपणे प्रकाशित होई. हे त्रैमासिक मराठी व गुजराथी अशा दोन्ही भाषेत निघत असे.

 या त्रैमासिकामध्ये सहकार चळवळीबरोबरच ग्रामीण पुनर्निर्माणाशी संबंधित या विषयांचा ऊहापोह केला जात होता. १९२७-२८ मध्ये सहकार खात्याकडून 'शेती व सहकार्य' त्रैमासिकाचे प्रकाशन सुरू करण्यात आले. हे त्रैमासिक गुजराथी भाषेत प्रकाशित होत असे. या त्रैमासिकाच्या माध्यमातून सहकाराबरोबरच शेतीशी संबंधित विविध विषयांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत होती. शेतकऱ्यांना शेती संदर्भातील विविध विषयांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी याच वर्षी सहकार खात्याने 'कृषी दिनदर्शिका'

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ४२