पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विविध प्रकारच्या एकूण ५८ सहकारी संस्था महाराजांनी बडोदा संस्थानात ९० वर्षांपूर्वी यशस्वीपणे कार्यरत केल्या. १९२७ मध्ये बडोदा संस्थानात आलेल्या महापुरात हानी झालेल्या जनतेच्या घरांची पुनर्बांधणी व इतर मदतीसाठी पूर निवारण संस्थेची सहकारी तत्त्वावर बडोदा शहरात सुरुवात केली.

 १९३१ साली महिलांच्या काटकसर संस्थांची निर्मिती सयाजीरावांनी केली. महिलांप्रमाणे पुरुषांच्याही काटकसर संस्था (बचत गट) सुरू करून सयाजीरावांनी आदर्श निर्माण केला. बांग्लादेशातील अर्थशास्त्रज्ञ आणि बचत गट चळवळीच्या कामाची दाखल घेऊन २००६ मध्ये ज्यांना नोबेल पुरस्कार दिला गेला त्या महंमद युनूस यांच्या अगोदर ५० वर्षे सयाजीरावांनी बडोद्यात हा यशस्वी प्रयोग केला होता.

 भारतातील बचत गट चळवळीचे जनक महाराजा सयाजीराव गायकवाड होते. सहकार चळवळीचा आरंभ केल्यापासून ते महाराजांच्या मृत्यूपर्यंत ३० वर्षांत बडोद्यात सहकारी संस्थांची वाढ १८ ते २० पट झाली तर लोकांचा सहभाग ४५ ते ४७ पट वाढला हा भारतातील आजअखेरचा विक्रम आहे. सहकार चळवळीचे ‘ग्रामजीवन' हे त्रैमासिक मुखपत्र मराठी व गुजराथी अशा दोन्ही भाषेत निघत असे. ग्रामजीवन हे मराठीतील सहकारविषयक पहिले मासिक आहे.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ४८