पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ग्रहणाच्या दिवशी सरकारी कार्यालयात घेण्यात येणारी सुटी हादेखील सरकारी पातळीवर पाळण्यात येणाऱ्या अंधश्रद्धेचाच भाग होता. प्रशासकीय व आर्थिक लाभ मिळविण्यासाठी ग्रहणाच्या दिवशी सरकारी कार्यालय बंद ठेवून धार्मिक विधी करण्याकडे कर्मचाऱ्यांचा कल असे; परंतु सयाजीरावांनी हुकूम काढून ग्रहणाची ही सुटी बंद केली. हा आदेश काढत असतानाच त्यांनी पाळलेली धार्मिक सहिष्णुता गोत्रीलिखित सयाजी चरित्रामध्ये अधोरेखित झाली आहे. गोत्री म्हणतात, “पृथ्वीची छाया चंद्रावर पडते त्यास 'ग्रहण' म्हणतात, हे सर्व सुशिक्षित लोकांना ठाऊक आहे; परंतु भोळे व भाविक लोक या दिवशी राहू किंवा केतू हे पापग्रह चंद्रास किंवा सूर्यास पीडा करतात, अशा समजुतीने तो दिवस धार्मिक कृत्यात किंवा बहुतेक निरुद्योगात घालवितात. ही त्यांची अज्ञान समजूत दूर व्हावी व त्यांना उद्योगाचे महत्त्व 'कळावे म्हणून बडोदे राज्यातील सरकारी कचेऱ्यात ग्रहणाच्या दिवशी रजा पाळीत असत, ती बंद करण्यात आली आहे व फक्त धार्मिक कारणानेच कोणास रजा पाहिजे असेल, तर त्याने रिपोर्ट करून रजा घावी, असे ठरविले आहे. यात लोकांच्या धार्मिक समजुतीसही महत्त्व दिल्याचे दिसून येते."

सार्वजनिक दानधर्म संस्थांचे नियमन

 राजवाड्यातील धर्मविधींना शिस्त लावत असतानाच या विधींवर होणारा अनाठायी खर्च कमी करणेदेखील अत्यावश्यक होते. ब्राह्मणास अन्नदान केल्यामुळे महत्पुण्य लाभते या हिंदू

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / १६