पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पातळीवर घेऊन चालणार नाही. कारण हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विवाह हा एक महत्त्वाचा धर्मसंस्कार आहे. हिंदू धर्मशास्त्र जाती अंतर्गत विवाहालाच मान्यता देते. इंदिराराजेंचा हा विवाह विचारात घेता तो जातीची चौकट मोडणारा होताच; परंतु त्यापुढे जाऊन तो आदिवासी-मराठा असा आंतरजमातीय विवाह होता. महाराजांनी या विवाहला मान्यता देऊन आपल्या सुधारणा कार्याला एकप्रकारे कृतिशीलतेची जोड दिली असेच म्हणावे लागेल.

स्वतंत्र धर्म खाते

 सयाजीरावांनी एप्रिल १९१७ मध्ये बडोदा संस्थानातील धर्मसुधारणेसाठी स्वतंत्र धर्म खात्याची सुरुवात केली. या विभागाचे प्रमुख म्हणून जगदीशचंद्र चटर्जी यांना धर्माधिकारी या पदावर नेमण्यात आले. त्याचवेळी जमनादास गंगाराम मेहता यांची धर्माधिकाऱ्यांचे प्रमुख सहायक म्हणून नेमणूक करण्यात आली. धर्म खात्याची सुरुवात करताना सयाजीरावांनी या खात्याला विशिष्ट जबाबदारी निश्चित करून दिली होती. त्यानुसार धर्म खात्याला देवस्थान विभाग, संस्कृत पाठशाळा, पुरोहित वर्ग, धार्मिक शिक्षणाची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर सार्वजनिक दानधर्म संस्थांचे नियमन, संस्कृत, पुरातत्त्वशाखीय व प्राच्यविद्याविषयक संशोधन, प्राचीन हस्तलिखितांचे संकलन, गायकवाड ओरिएंटल सिरीजचे प्रकाशन याचीदेखील

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / २९