पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळणारा वाढता पाठिंबा पाहून कोंडीत सापडलेल्या नेहरूनी आपली ही भूमिका बदलून हिंदू कोड बिल सुधारित स्वरूपात विधिमंडळात सादर करणार असल्याचे जाहीर केले.
 १९५१ मध्येच हिंदू कोड बिलाला कायदे मंडळात होणाऱ्या विरोधाला सतं ापून बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला हे जगविख्यात आहे. या पार्श्वभूमीवर बडोद्याच्या हिंदू कोड बिलाची चर्चा के ली असता सयाजीरावांच्या कामाचे मोल अधिक स्पष्टपणे पुढे येते. बडोद्याच्या हिंदू कोड बिलातील पहिला कायदा हिंदू विवाह कायद्याच्या रूपाने १९०५ मध्ये लागू झाला आणि यातील शेवटचा कौटुंबिक सपं त्तीतील स्त्रियांचा हक्क कायदा हा १९३३ मध्ये लागू झाला.

बडोद्यातील हिंदू कोड बिल (१९०५-१९३३)  जानेवारी १९०५ मध्ये बडोद्यात हिंदू विवाह कायदा लागू करून हिंदूसदं र्भातील कायद्यांच्या एकत्रीकरणाला सयाजीरावांनी आरंभ के ला. सयाजीरावांचे हे काम क्रांतिकारक होते. कारण भारतीय राज्यघटनेत या विषयाची चर्चा होण्याअगोदर ४५ वर्षे याची अंमलबजावणी बडोद्यात सरू झाली होती. तर उर्वरित भारतातील हिंदू महिलांना जे हक्क मिळायला ६०-७० वर्षे सघं र्ष करावा लागला ते हक्क बडोद्यातील स्त्रियांना उर्वरित भारतातील

हिंदू स्त्रियांच्या अगोदर ११५ वर्षे मिळाले होते.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल /१