पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्यात आली. तसेच हिंदू स्त्रीच्या स्रीधनावरील अधिकाराची व्याप्ती विशद करण्यात आली. हिंदू स्त्रियांचे अधिकार स्पष्ट करतानाच यासबं ंधीचे कुटुंबातील इतर व्यक्तींचे हक्कदेखील स्पष्ट करण्यात आले.
 १९११ पर्यंत यातील चार कायदे बडोद्यात लागू करण्यात आले. तर शेवटचा सहावा हिंदू स्त्रियांचा सपंत्तीतील हक्कांसदं र्भातील कायदा १९३३ मध्ये पास झाला. हिंदू धर्माच्या अधिकृत ग्रंथातील तत्त्वांचा आधार घेऊन याची मांडणी करण्यात आली होती. १९४२ मध्ये हिंदू कोड बिलात दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीनुसार एक विवाहास हिंदू कायद्याचा भाग बनवण्यात आले.
 सयाजीरावांच्या या ऐतिहासिक कामाची नोंद घेऊन हिंदू कायद्यांमध्ये सध ारणा आणि सश ोधनासाठी स्थापन झालेल्या ‘द ऑल इडिया हिंदू लॉ रिफॉर्म अँण्ड रिसर्च असोसिएशन’ या मुंबई स्थित ससं ्थेने महाराजांना १९२९ मध्ये आश्रयदाते होण्याचे निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाचा स्वीकार करणाऱ्या ३ ऑगस्ट १९२९ च्या पत्रात सयाजीराव लिहितात, ‘द ऑल इडिया हिंदू लॉ रिफॉर्म अँण्ड रिसर्च असोसिएशन’ चे आश्रयदाते म्हणून आपण मला आमंत्रित करीत आहात. मी आनंदाने त्यासाठी तयार आहे. अशा चळवळीला माझा पाठिंबा आहे. अशी चळवळ यशस्वी

आणि उपयोगी सिद्ध व्हावी.”

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल /१५